उळुंब जि. प. शाळेत वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मैत्री संस्था व प्रियदर्शनी विधी महाविद्यालयातर्फे उळुंब येथील जि. प. शाळेत वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीचा संदेश.

स्थैर्य, फलटण, दि. २३ ऑगस्ट : मैत्री बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आणि प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उळुंब (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण, शालेय साहित्य व खाऊ वाटप उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करताना रवींद्र बेडकीहाळ यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण ही सर्वात प्रभावी पद्धत असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि ते भविष्यात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्नशील राहतील. पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी व भावी पिढीला शुद्ध हवा मिळण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास विधी महाविद्यालयाचे प्राचार्य मोरे, फरांदवाडीचे केंद्रप्रमुख शेखर चागण, मंगेश सावंत, सरपंच संपत कळंबे, अशोक कळंबे, मुख्याध्यापक राजेंद्र अहिवळे, सहशिक्षिका गौरी जमदाडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कळंबे यांनी केले, तर आभार राजेंद्र अहिवळे यांनी मानले.

Back to top button
Don`t copy text!