ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२३ । मुंबई । भारतातील आघाडीची एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन पुरवणारी कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २४च्या ३० जून २०२३ रोजी समाप्त पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल आज जाहीर केले. कंपनीच्या या तिमाहीतील एकूण उत्पन्नामध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ७.८ टक्के वाढ नोंदवली गेली, तर नफ्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.७ टक्के वाढ झाली.

टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अगरवाल म्हणाले, “ग्राहकांकडून कमी झालेली मागणी, आयात-निर्यात व्यापारातील मंदी आणि मध्यम स्वरूपाची पतवाढ या प्रतिकूलता उद्योगक्षेत्रात असूनही कंपनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आमची गोदामे, ३पीएल सेवा व उदयोन्मुख व्हर्टिकल सोल्यूशन्समुळे मागणी वाढत आहे. त्याचबरोबर ऑटोमोटिव्ह क्षेत्रांतूनही जोरदार मागणी आहे. शिवाय पावसाळा चांगला झाल्यामुळे तसेच आगामी सणासुदीच्या काळात ब्रॅण्ड्सना मागणी वाढणार आहे.”

एकेरी (स्टॅण्डअलोन):

कंपनीचे कार्यसंचालनामधून मिळालेले उत्पन्न ८,८७६ दशलक्ष रुपये झाले आहे ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत ७.८ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १,१५१ दशलक्ष रुपयांवर असलेला ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,२४४ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ७६६ दशलक्ष रुपयांवर असलेला कर पश्चात नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८.७ टक्क्यांच्या वाढीसह ८३३ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.

एकत्रित (कन्सॉलिडेटेड):

कंपनीचे कार्यसंचालनामधून मिळालेले उत्पन्न ९,५८३ दशलक्ष रुपये झाले आहे ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत ५.५ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १,१९१ दशलक्ष रुपयांवर असलेला ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,२६७ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ७८६ दशलक्ष रुपयांवर असलेला कर पश्चात नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५.९ टक्क्यांच्या वाढीसह ८३२ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.


Back to top button
Don`t copy text!