फडतरवाडी येथे कृषीकन्यांनी दिले खवा बनवण्याचे प्रशिक्षण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । फलटण । फडतरवाडी ता. फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024- 25 अंतर्गत खवा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवून गावातील स्त्रियांना प्रशिक्षण केले आहे.

दुधापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात येतात सबंधित त्यातील एक म्हणजे खवा आणि त्या पासून बनणारे विविध पदार्थ व ते जास्त काळ ठीकवून कसे राहतील याचे देखील महत्व पटवून दिले. प्रक्रिया पूर्ण होण्यानतर महिलांनी त्या बद्दल चांगला प्रतिसाद दिला

यावेळी कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे, वैष्णवी चांदगुडे , निधी कोडपे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला.
या कार्यक्रमा साठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतिषा पंडित, प्रा. सुरेश साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!