पांचगणी मुख्य रस्त्यावर पर्यटकांच्या चारचाकी गाडीचा अपघात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । पांचगणी । पांचगणी – महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर बस स्थानक ते काचबावडी नाक्याचे मध्यावर रेश्मी चोक चौका जवळ एका वळणावर पर्यटकाची चारचाकी पलटी होवून अपघात घडल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये एक महिला जखमी झाली असल्याची माहिती पोलिसानी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की रेश्मी चौक शेजारील निवासरकर बंगल्याजवळ एका वळणावर पर्यटकांच्या चारचाकी (गाडी क्रमांक Dl3CBE2521) गाडीचा अपघात होवून ती पलटी झाली. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ही गाडी डाव्या बाजूच्या डोंगरावर धडकली आणि पलटी झाली. या गाडीत दोघेजण होते. यामधील महिला जखमी झाली असून तिच्या डोक्याला जखम झाली असून दवाखान्यात दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस प्रमुख श्री अरविंद माने व त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये म्हणुन लागलीच क्रेन बोलावून गाडी काढली व रस्ता निर्धोक केला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!