उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उद्या फलटण दौऱ्यावर; सभेची जय्यत तयारी सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2024 | फलटण | भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे उद्या दि. १७ रोजी फलटण दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते नीरा – देवधर, फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्प व नाईकबोंबवाडी एमआयडीसी यांसह विविध कामांचे भूमिपूजन समारंभ आयोजित केला आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुल येथे उद्या दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होत असलेल्या सभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाकडून जय्यत तयारी सुरु आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या वचनाची वचनपूर्ती सोहळा उद्या दि. १७ जानेवारी रोजी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात गेले अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले नीरा – देवधर प्रकल्प, फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्प, नाईकबोंबवाडी येथील एमआयडीसी हे प्रश्न कायमस्वरूपी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निकाली काढले आहेत. खासदार रणजितसिंह यांनी दिलेले वचन पाळले असून त्यामुळे वचनपूर्ती सोहळा आयोजित केला आहे.

माजी खासदार स्व. हिंदुराव यांचे स्वप्न सत्यात

माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटणसाठी पाहिलेले स्वप्न म्हणजे नीरा – देवधर प्रकल्प व फलटण रेल्वे; हे दोन्ही प्रकल्प आता सत्यात उतरत आहेत. फलटण ते पुणे रेल्वे सुरु झाली असून फलटण ते बारामती रेल्वे जोडल्याने दक्षिण भारताला थेट पश्चिम महाराष्ट्रात फलटणच्या माध्यमातून कनेक्टिव्हीटी तयार झाली आहे. माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न त्यांचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सत्यामध्ये उतरत आहेत.


Back to top button
Don`t copy text!