दैनिक स्थैर्य | दि. 11 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण शहरासह तालुक्यांमधील ओबीसी संघटन मजबूत करण्यासाठी तालुक्यामधील गाव निहाय घोंगडी बैठका आयोजित करून ओबीसी संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच फलटण शहरांमध्ये असणाऱ्या श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये ओबीसी संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्याचा सुद्धा निर्णय ओबीसी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे.
फलटण येथील श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये फलटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये संघटनेचे विविध समन्वयक बोलत होते.
फलटण शहरासह तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी व ओबीसी बांधवांना नियमित मार्गदर्शनासाठी फलटण येथील श्री संत सावता महाराज मंदिरात फलटण तालुका ओबीसी संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या नियमित समस्या सोडवण्यात येणार आहे.