कोरोना रुग्णावर सायकलने हॉस्पिटल गाठण्याची वेळ!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.५: कोरोना संक्रमणाविरुद्ध अवघा देश लढतोय. मध्य प्रदेशातही शिवराज सरकारकडून कोरोनाशी जीव तोडून लढण्याचा दावा केला जातोय. परंतु, राज्यातील आरोग्य व्यवस्थेचं खिळखिळेपण एका अजब आणि तितक्याच गंभीर प्रकरणातून समोर आलंय. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका तरुणाला अनेक प्रयत्नानंतरही रुग्णालयात पोहचण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा अन्य साधन मिळालं नाही. त्यामुळे शेवटी निराश न होता या रुग्णाला चक्क सायकलची मदत घ्यावी लागली. १० किलोमीटर सायकल चालवत हा रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहचला.

कोविड रुग्णाची ही परिस्थिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर नागरिकांमध्येही कोरोनाची धास्ती वाढलीय. मध्य प्रदेशच्या शहडोल मुख्यालयाच्या पांडवनगर वॉर्ड क्रमांत ७ मध्ये राहणा-या धर्मेंद्र सेन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्टची माहिती मिळाली तेव्हा धर्मेंद्र घरीच होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्यांच्यासहीत त्यांचे कुटुंबीयही धास्तावले. सोबतच शेजारीही त्यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्यासाठी दबाव टाकू लागले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्यांना स्वत:लाही रुग्णालयात दाखल व्हायचं होतं परंतु, त्यांना रुग्णालयात पोहचण्यासाठी साधनच मिळेना. कोरोना पीडित धर्मेंद्र यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी फोन करण्यात आला मात्र त्यांना घेण्यासाठी ना अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली ना आरोग्य विभागाकडून त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणी आलं… कोरोना पॉझिटिव्ह तरुण आणि त्याचे कुटुंबीय फोनवरून आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!