सातारा बसस्थानकात भरदुपारी थरार; धारदार चाकूने युवकाने कापली हाताची नस

दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२६ | सातारा |
शुक्रवारी भरदुपारी एका युवकाने सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात धारदार चाकूने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापली. बसस्थानकात गर्दी असताना युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. युवकाने नस कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रक्ताने भरलेल्या अवस्थेतच हा युवक काही काळ बसस्थानकात फिरत होता.

यावेळी बसस्थानकातील काही नागरिकांनी त्या युवकास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो युवक नागरिकांपासून दूर पळत होता. हा युवक एसटी स्टँड, स्टेडियम रोड, राधिका रोड असा पळत गेला. अखेर स्थानिक नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या हातातील धारदार चाकू हिसकावला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी युवकास रुग्णालयात दाखल केले.

Back to top button
Don`t copy text!