महाबळेश्वर हुन वाईला येणारी जीप धडकून कालव्यात पडून तीन जण गंभीर जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | वाई | महाबळेश्वर हुन वाई ला येणारी जीपने दुचाकीला व रस्त्याने चालणाऱ्या महिलेला धडक देऊन धोम धरणाच्या उजव्या कालव्याच्या धडकून कालव्यात कोसळली.या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

आज दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वर हुन वाई ला येणारी जीप क्रमांक (एम एच ११ए के ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली. यामुळे या अपघातात दुचाकीचालक, चालणारी महिला व जीपचा चालक गंभीर जखमी झाले. या सर्वांवर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कालव्यातून जीप बाहेर काढून पोलीस ठाण्यात लावली आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र हा अपघात झाला तेव्हा या परिसरात गर्दी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.जीप मध्ये एकटा चालकच होता.अन्यथा पाण्याने भरून वाहणाऱ्या कालव्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वायदंडे अधिक तपास करत आहे.

Back to top button
Don`t copy text!