दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । बुधवार नाका परिसरात शाहूपुरी पोलिसांनी येथील सर्विसिंग सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण सहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा एक लाख 51 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी रवींद्र शंकर आवळे वय 35 राहणार 270 बुधवार पेठ सातारा, शामराव यशवंत कुऱ्हाडे वैचारिक रा. नामदेववाडी झोपडपट्टी सातारा मनोज संपत माने व 49 रा. बुधवार पेठ सातारा, रामा यमनप्पा देऊर रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा, दिलीप प्रभाकर गायकवाड, मेहर देशमुख कॉलनी करंजे सातारा, कल्याण मारुती खवले रा. सिटी कोर्ट बिल्डिंगच्या पाठीमागे मोळाचा ओढा सातारा या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बुधवार नाका येथील सर्विस सेंटरच्या पाठीमागे तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या बातमीची खात्री केल्यानंतर पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सदर पथकाने बुधवार नाका येथील सर्विसिंग सेंटरच्या पाठीमागे अचानकपणे दुपारी छापा टाकला. तेव्हा अवैध तीन पानी जुगार चालू असल्याचे आढळून आले. संबंधित इसमांकडून अवैध जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल हँडसेट व मोटरसायकल असा एक लाख 51 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध जुगार खेळत असल्यास प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व पोलीस निरीक्षक संजय पतंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, निलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी कारवाईक भाग घेतला होता.