दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । टोल नाका परिसरात जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावरील तासवडे टोल नाका परिसरात असणार्या शौचालयाजवळ भरत शंकर सावंत वय 38 यांच्याशी बोलत बोलत यांनी सावंत यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची गोफ टाईप असणारी सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत.