
स्थैर्य, फलटण, दि. १९ : राज्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केलेले आहे.
रस्त्यावर विनामास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकत्याच दिलेल्या आहेत.