मंगळावर यशस्वीरित्या उतरला नासाचा पर्सिव्हरन्स रोव्हर


स्थैर्य,वॉशिंग्टन,दि.१९:  अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ गुरूवारी मंगळ ग्रहावरील पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी जजिरो क्रेटरवर यशस्वीरित्या उतरला. भारतीय वेळेनुसार या रोव्हर गुरूवार आणि शुक्रवाराच्या दरम्यान रात्री दोन वाजता मंगळावरील सर्वात धोकादायक जजिरो क्रेटरवर लँडींग केली.

सहा पायांचा हा रोबोट सात महिन्यात 47 कोटी किलोमीटराचा प्रवास पूर्ण करत आपल्या लक्षाजवळ पोहचला आहे. शेवटचे सात मिनट या रोबोटसाठी खुपच कठीण आणि धोकादायक होते. यावेळी, ते फक्त 7 मिनिटांत 12 हजार मैल प्रति तासावरुन 0 वेगावर येत नंतर ती लँडिंग झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीही त्यांच्या कार्यालयातून हे लँडिंग पाहिले.

एकेकाळी या जागेवर पाणी असून नासाने दावा केला आहे की, ही इतिहासातील सर्वात अचूक लँडींग आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळ ग्रहावरून माती आणि खड्याचे नमूनेदेखील घेऊन येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!