प्रशांत नाळे यांच्या निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. १९ : सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष कै. प्रशांत नाळे यांच्या समरणार्थ फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शोकसभेस विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहात (श्रीराम मंदिराशेजारी) हि शोकसभा पार पडणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व प्रशांत नाळे मित्र परिवारातील सर्व सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या शोक सभेस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रशांत नाळे मित्रपरिवाराद्वारे केले आहे.


Back to top button
Don`t copy text!