स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४ : सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक
नियम 1 डिसेंबर 2020 पासून बदलले जाणार आहेत. एलपीजी सिलिंडरसह, रेल्वे
आणि बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये पुढच्या महिन्यापासून बदल होणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ची वेळ
डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या
किंमतींमध्येही बदल होणार आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत.
1) 24 तास मिळणार RTGS सुविधा
बँकांच्या पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियम डिसेंबरपासून बदलणार आहेत.
आरबीआयने आरटीजीएस सुविधा 24 तास सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. सध्या
ही सुविधा महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व
कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहे. पण ही डिसेंबरपासून आरटीजीएसमार्फत 24
तासांत कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता.
2) एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलणार
सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलते.
म्हणजेच 1 डिसेंबरपासून देशभरात गॅसच्या किंमती बदलल्या जातील. गेल्या
महिन्यात व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.
3) प्रीमियममध्ये करू शकाल हे बदल
5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50% कमी करू शकतात. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकाल.
4) 1 डिसेंबरपासून धावतील नव्या रेल्वे
भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोना
संकटानंतर रेल्वेनं गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 1 डिसेंबरपासून
गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम किमतींवरही पाहायला
मिळेल.