समाजाचे नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना, बैठकीनंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य,मुंबई,दि २: सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बातचीतदरम्यान मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले की, ‘मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फडणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे,’ अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी चव्हाण म्हणाले की, ‘आज झालेल्या बैठकीत गेल्या 10-12 दिवसातील हायकोर्टाच्या निर्णयांवर चर्चा झाली. EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली.’

आदित्यनाथांवर मनसेचा ‘ठग’हल्ला

‘आज खासदार संभाजीराजेही भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. कोरोनामुळे कोर्टाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,’ असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!