
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा शहर व परिसरातून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार दुचाकी वाहने चोरून नेली. याप्रकरणी शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चंदननगर, सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच ५० एबी ०४८४ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी दत्तात्रय कुंडलिक जरग (वय ४०, रा. काटेवाडी, ता. पाटण) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही चोरीची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली आहे.
दुसरी तक्रार चेतन प्रमोद पुराणिक (वय ३८, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
अज्ञात चोरट्यांनी मंगळवार तळे येथूनही दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत.