स्थैर्य,सातारा, दि.२१: सातारा येथील जरंडेश्वर नाक्यावरील जरंडेश्वर मारुती मंदिरासमोर सातारा एलसीबीच्या पथकाने दोन मोटार सायकल चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना दि. 19 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जुना आर. टी. ओ. चौक ते वाढे फाटाकडे जाणार्या रोडवरील जरंडेश्वर मारुती मंदिरासमोर दोनजण 2 वेगवेगळ्या मोटार सायकलवरुन वाढे फाटा बाजूकडे जाताना दिसले. त्यांच्यापैकी एकाच्या गाडीवर नंबरप्लेट नसल्याने त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन्ही मोटार सायकल चोरीच्या असल्याची माहिती दिली. त्यापैकी एका मोटारसायकलच्या चोरीप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात तर दुसर्या मोटारसायकलच्या चोरीप्रकरणी राजगड पोलीस ठाणे (जि. पुणे) येथे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार तानाजी माने, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, संकेत निकम, गणेश कचरे यांनी केली.