“बाबा” माढा लढवा लागतोय; फलटणमध्ये कार्यकर्त्यांचे स्टेटस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 मार्च 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उर्फ बाबा यांनी आगामी कोणत्याही पक्षाच्या कडून माढा लोकसभा निवडणूक लढवावी लागत आहे; असे मत फलटण तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांनी WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.

काल महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे अधिकृत तिकीट हे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माढा लोकसभा लढवणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पक्षाकडून लोकसभा लढवावी; असे मत कार्यकर्ते सोशल मीडिया द्वारे व्यक्त करीत आहेत.

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माढा लोकसभा लढवावी अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. तरी सुद्धा माढा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. त्यामुळे आता आगामी लोकसभा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लढवावी; असे मत व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!