सातारा शहर परिसरातून मोटरसायकलची चोरी


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरातून मोटरसायकलची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा ते दीड वाजण्याच्या दरम्यान राजेंद्र शेषप्पा बारवडे वय 60, रा. मल्हार पेठ, सातारा यांची हिरो होंडा कंपनीची घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केलेली मोटरसायकल क्र. एमएच 12 इएस 6447 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक टकले करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!