सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास रोहित राजा शेलार वय 33 रा. शहापूर ता. कराड हा मादक पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करीत होता. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!