कोंडवे येथून ४२ हजार रुपयांची चोरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । कोंडवे, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ ऑक्टोंबर रोजी ११.४५ ते २ वाचण्याच्या सुमारास कोंडवे येथील किशोर प्रल्हाद गायकवाड यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील ४२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!