चाकुचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंदसातारा डी. बी. पथकाची कामगिरी : एक अल्पवयीन युवकही ताब्यात


 

स्थैर्य, सातारा, दि.११: वाढे फाटा येथे रात्री महामार्गावर थांबलेल्या कॉलेजमधील युवकास चौघाजणांनी चाकुचा धाक दाखवून मारहाण करून रोकड आणि मोबाईल असा ऐवज लुटला होता. या गुन्ह्याचा सातारा तालुका पोेलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने अवघ्या दोन तासात छडा लावत तिघांना ताब्यात घेतले. करण अनिल लादे वय 21 आणि अक्षय राजेंद्र चव्हाण वय 20 दोघेही रा. रा. कोयना सोसायटी, सदर बाझार सातारा अशी संशयितांची नावे आहेत तर एकजण अल्पवयीन आहे. 

याबाबत माहिती अशी, पुणे बेंगलोर महामार्गावर वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर एक कॉलेज युवक थांबला होता. त्याठिकाणी चार अनोळखी युवकांनी येवून त्यास चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच त्याच्याकडून 1350 रुपये रोख व ओप्पो कंपनीचा मोबाईल घेवून सर्वजण पसार झाले. 

याप्रकरणी आकाश शंकर चौगुले रा. मंगळवारपेठ सातारा यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने कौशल्यपुर्वक माहीती प्राप्त करुन एका संशयीतास ताब्यात घेतले. त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अन्य तीन साथीदारांसमवेत गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांमध्ये एक अल्पवयीन युवक आहे. या गुन्ह्यातील रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. 

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, हवालदार दादा परिहार, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. उदयसिंह पावरा यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!