
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. 27 : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्तं विनम्र अभिवादन. माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन.
