टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कर चालकाचा जागीच ठार; तर एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ७ : आळंदी – पंढरपूर पालखी राजमार्गावर फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कर चालकाचा जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. सुहास मारुती गरगडे (वय २२, रा. गरगडे वस्ती, गुणवरे ता. फलटण) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत फळं ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी कि, बुधवार दि. ६ जानेवारी रोजी सुहास गरगडे व त्याचा चुलत भाऊ सौरभ हणमंत गरगडे हे फलटण वरून इंडिका कारने गुणवरे येथे निघाले होते. सुहास गरगडे हा गाडी चालवित होता. गाडी विडणी गावच्या हद्दीत पवारवाडी जवळील बाळासाहेब गाडे यांच्या बंगल्यासमोर आली असता फलटणकडे भरधान वेगाने निघालेल्या आयशरने राँग साइडला येऊन धडक दिली. यामध्ये सुहास मारुती गरगडे याचा मृत्यू झाला तर त्याच्या समवेत गाडीमध्ये असलेला त्याचा भाऊ सौरभ हणमंत गरगडे (वय २१) हा गंभीर जखमी झाला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात घडला.
आयशरचा चालक मारुती विठ्ठल कोडग (वय ४० रा. आवंडी, ता. जत, जि. सांगली) याला घटनास्थळावरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे. त्याच्या विरोधात मृत्यूस व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हा नोंद झाला आहे. या अपघाताचा तपास पोलीस हवालदार डी. डी. कदम हे करित आहेत. दरम्यान सुहास गरगडे याच्यावर गुणवरे येथे रात्री आठच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Back to top button
Don`t copy text!