फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचे कार्य कौतुकास्पद : ला. मंगेश दोषी


स्थैर्य, फलटण, दि. ७ : फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार प्राप्त झाला. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी फलटण मध्येही काम करत असताना गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवत सर्वसामान्य जनतेची सेवा कोणत्या व कश्या प्रकारे करता येईल हाच विचार करीत असल्याचे मत फलटण येथील जेष्ठ उद्योजक मंगेश दोषी यांनी व्यक्त केले.
फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल फलटण येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने तानाजी बरडे यांचा यथोचित सन्मान आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी मंगेश दोषी बोलत होते. या वेळी जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, सचिव डाॅ. ऋषिकेश राजवैद्य, खजिनदार श्रीपाल जैन, इव्हेंट चेअरपर्सन अजित दोशी, को-ऑडींनेटर राजेंद्र कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!