दंगलीतील नुकसानीबद्दल राज्य सरकारने भरपाई द्यावी; भाजपा प्रदेश व्यापार आघाडीची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । राज्यात अमरावती, नांदेड व मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगलीत समाजकंटकांकडून अनेक दुकानांची लुटालूट करण्यात आली. दंगलखोरांना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने त्वरीत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश व्यापारी आघाडीतर्फे बुधवारी करण्यात आली. व्यापारी आघाडीच्या कार्यकारिणी बैठकीत ही मागणी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांत अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची लुटालूट केली गेली. पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याने या नुकसानीबद्दल राज्य सरकारने तातडीने भरपाई द्यावी, असे आघाडीने म्हटले आहे.

या बैठकीला आघाडीचे प्रभारी माजी आमदार राज पुरोहित, आघाडीचे प्रदेश संयोजक विनोद कांकाणी, सह संयोजक महेंद्र जैन, जुगलकिशोर जकोटिया, विवेक बनगीनवार, विकास जगताप, हरेश रेलन, सुनील वाघ, श्रीनिवास दायमा आदी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!