महाविद्यालयीन मागसवर्गीय प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी वसूल करु नये – सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । मागासवर्गीय पात्र प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून भारत  सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजना करिता सर्व कॉलेज, महाविद्यालयांनी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त  फी  वसुल करण्यात येऊ नये. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण  नितीन उबाळे  यांनी केले आहे.

सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यानुसार  शिष्यवृत्ती योजनेच्या शासन निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांनी   भारत सरकार मँट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी  व इतर  योजना करिता अनुसूचित जाती. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून समाज कल्याण विभागाकडून दिले जाणारे कोणतेही शुल्क आकारु नये.  तसेच  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची अडवणुक करण्यात येऊ नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल असे निर्देशही देण्यात आले आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत  सरकार मँट्रीकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन दिला जातो.

Back to top button
Don`t copy text!