दैनिक स्थैर्य । दि. 4 आक्टोंबर 2024 । फलटण । फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून प्रमुख राजकीय पक्षांनी बौध्द समाजाला उमेद्वारी द्यावी याबाबत संविधान संघर्ष समितीच्यावतीने फलटण तालुक्यातील प्रमूख नेत्यांकडे मागणी करण्यात आली होती याचाच पुढचा भाग म्हणून पुन्हा एकदा फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातून गावभेट दौरा सुरु करण्यात आला आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये असणारा बौध्दसमाज एकत्रित करुन येणार्या विधानसभा निवडणकीमध्ये समाजातील उमेदवाराला उमेदवारी मिळण्यासाठी बौध्द समाजातील सर्व राजकीय पक्ष व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हे एकत्रित आलेले आहेत. काही झाले तरी बौध्द समाजाचा उमेदवाराच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून जाण्यासाठी सर्व समाजबांधव प्रयत्नशील आहेत.