दागिने व रोकडसह सापडलेली पर्स महिलेस प्रामाणिकपणे परत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा, दि. 29 : सोन्याचे दागिने व 40 हजार रुपयांची रोकड असलेली, रस्त्यांवर पडलेली पर्स संबंधित महिलेला प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते हैदर मेटकरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाजारहाट करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ महिलेची 40 हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि औषधांच्या गोळ्या असलेली पर्स सतत वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य चौकात पडली. पर्स नसल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने खूप शोधाशोध केली परंतु पर्स काही मिळाली नाही. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गाड्यावर फिरुन फळे विक्रीचा व्यवसाय करणारे हैदर शब्बीर मेटकरी यांना सदर पर्स सापडली. सापडलेली पर्स त्यामधील रोकड, दागिने ओळख पटवून घेऊन जावे, अशी दवंडीच हैदर मेटकरी यांंनी पिटली होती. या दरम्यान एक ज्येष्ठ महिला रस्त्याने रडत चाललेली हैदर मेटकरी यांना दिसताच त्यांनी कारण विचारले असता त्यांनी पैशाची पर्स पडल्याचे त्यांना सांगितले. हैदर मेटकरी यांंनी त्या पर्समध्ये काय काय होते, अशी विचारणा केल्यावर सदर महिलेने पर्समध्ये डॉक्टरची चिठ्ठी, औषधाच्या गोळ्या, 40 हजार रुपये रोख, कानातील सोन्याच्या रिंगा, अंगठी असल्याचे सांगताच ओळख पटली व ही पर्स मेटकरी यांनी सर्वांसमक्ष महिलेला परत केली. प्रामाणिकपणे पैश्याची पर्स परत करणार्‍या हैदर मेटकरी यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!