श्रीमंत संजीवराजेंच्या हस्ते उद्या फलटण पालखीतळ स्वच्छता मोहिमेस सुरुवात


दैनिक स्थैर्य | दि. 10 जुलै 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्या फलटण येथील पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी असतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मुक्काम उरकून बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर एका दिवसानी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीतळाची स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ प्रतिवर्षी करण्यात येत असतो.

पालखी तळ स्वच्छता मोहिम ही मे.नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, फलटण नगर परिषद, फलटण, पंचायत समिती, फलटण, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, गोविंद मिल्क, फलटण, महाराजा उद्योग समूह, फलटण, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि.फलटण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि.फलटण, श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था लि.फलटण, पत्रकार बंधू, बिल्डर्स असोसिएशन, क्रीडाई, लायन्स क्लब, जायंट्स ग्रुप, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!