दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी, क्रीडा समिती फलटण व फलटण जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फलटण क्रॉसकंट्री स्पर्धा ह्या महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स कोच श्री. राजगुरू कोथळे तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व युवा नेते युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या स्पर्धेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये १७०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई, बारामती, गडहिंग्लज, बेळगाव, अहमदनगर, श्रीगोंदा अशा विविध ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण ‘फलटण टुडे न्यूज नेटवर्क’वरून करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये १० वर्षा आतील मुले/मुली, १५ वर्षा आतील मुले/मुली, १८ वर्षाखालील मुले/मुली, खुला गट पुरुष व महिला, ३० वर्ष पुढील पुरूष व महिला, ४५ वर्षापुढील पुरूष व महिला, ६० वर्षापुढील पुरूष व महिला असे सात गटातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील प्रथम/ द्वितीय/ तृतीय क्रमांक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, मेडल व टी-शर्ट देण्यात आले. तसेच सहभागी खेळाडूंनाही सहभाग प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सर्व स्पर्धकांना अल्पोपहार म्हणून बिस्किटे, केळी, लेमन गोळ्या व गोविंदच्या सुगंधी दूधाचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेत वयोगटानुसार यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे –
- १० वर्षाखालील मुले : (०२ कि. मी.)
१) राजवीर धीरज कचरे – फलटण
२) सार्थक शिवाजी वाघ – वाघाची वाडी
३) सुयेश दत्तात्रय धायगुडे – सीबीएसई फलटण
३) यश अधिक ढेकळे – शौर्य अकॅडमी
- १० वर्षाखालील मुली : (०२ कि.मी.)
१) प्रज्ञा उमाजी पाटोळे – विटा
२) ईश्वरी सचिन पवार – माझेरी
३ स्वरा योगेश भागवत – गोखळी
- १५ वर्षा आतील गट मुले – (०३ कि.मी.)
१) मयुरेश संतोष सरगर – सांगोला
२) सुयेश सोपान अलदर – सांगोला
३) साहिल संजय शिंदे – मुधोजी कॉलेज
- १५ वर्षाआतील गट मुली – (०३ कि.मी.)
१) चैत्राली दत्ता चव्हाण – मार्डी
२) वनिता लालासो ठोंबरे – वडगाव
३) आकांक्षा संजय देवकर – मार्डी
- १८ वर्षा आतील मुले (०५ कि. मी.)
१) राम नामदेव मदने – कोळे
२) शुभम बापू माने – वाई ३) सार्थक रंगनाथ काळेल – माणदेशी
- १८ वर्षा आतील मुली (०५ कि.मी.)
१) आर्या अजिनाथ काळेल – माणदेशी
२) श्रावणी नरेंद्र लिंबे – मांढरदेव
३) अश्विनी नवनाथ हिरडे – श्रीगोंदा
- ३० वर्षापुढील पुरुष – (०७ कि.मी.)
१) सचिन गणपत निकम – कुडाळ
२) पंकज दत्तात्रय जाधव – दहिवडी
३) नितीन हनुमंत गोडसे – एद आर्मी
- ३० वर्षांपुढील महिला (०७ किमी)
१) प्रियंका ज्ञानेश्वर भोसले फलटण
२) छाया कल्याणराव मिंड – सीबीएसई इंग्लिश मीडियम
३) परवीन फारूक मुलानी – एसएससी इंग्लिश मीडियम
- ४५ वर्षापुढील पुरुष – (०५ कि.मी.)
१) दत्तात्रय महादेव कदम – बारामती
२) आप्पासाहेब शंकर कुंभार – सातारा
३) संतोष किसनराव भोसले – फलटण
- ४५ वर्षापुढील महिला – (०५ कि.मी.)
१) अर्चना मोहन यादव – फलटण
२) उज्वला नागेश बोडरे – सीबीएसई इंग्लिश मीडियम
३) अंजुम आलम शेख – एसएससी इंग्लिश मीडियम
- ६० वर्षापुढील पुरुष – (०३ कि.मी.)
१) अशोक माधवराव आमले – पुणे
२) बजरंग महादेव चव्हाण – गारगोटी
३) रामचंद्र वामन भोसले – बी. जे. इंग्लिश मीडियम
- ६० वर्षापुढील महिला- (०३ कि.मी.)
१) जयश्री भागवत रनवरे – शेती शाळा
२) आशा गौतम पवार – बारामती
३) कुसुम पोपटराव गावडे – फलटण
- खुला गट – महिला (१० कि. मी.)
१) साक्षी संजय जड्याळ – चिपळूण
२) वैष्णवी विलासराव सावंत – म्हसवड
३) संतोषी महादेव तरडे – म्हसवड
- खुला गट – पुरुष (१० कि.मी.)
१) महादेव गजानन कोळेकर
२) निशांत विलास सावंत – म्हसवड
३) करण हणमंत वाघले – मांढरदेवी
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स कोच श्री. राजगुरू कोथळे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. गंगवणे बी. एम., सौ. मीनल दीक्षित, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, श्री. पी. डी. पाटील, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगवणे बी. एम., क्रीडा समितीचे सदस्य श्री. शिरीष वेलणकर, श्री. महादेव माने, श्री. संजय फडतरे, तसेच श्री. भिमदेव बुरुंगले, क्रिकेट अॅकॅडमीचे मार्गदर्शक श्री. गाडगीळ, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य श्री. देशमुख डी. एम., पर्यवेक्षक श्री. व्ही. जी. शिंदे, हॉर्टिकल्चरचे प्राचार्य श्री. निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. कोळेकर हे उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ सर, सदस्य प्रा.डॉ.स्वप्नील पाटील, श्री. तायप्पा शेंडगे सर, श्री. राज जाधव सर, श्री. नामदेव मोरे, श्री. उत्तम घोरपडे सर, श्री. नाना तांबे, श्री. अमोल नाळे व प्रविण काकडे, श्री. सुरज ढेंबरे, श्री. अमित काळे, श्री. कुमार पवार, श्री. सुहास कदम, श्री. हर्षल कदम, श्री. खुरंगे बी. बी., श्री. जाधव डी. एन., कु. धनश्री क्षीरसागर, सौ. गाडवे, सौ. गेजगे, श्री. सूळ ए. बी., श्री. बनकर एस. एस., श्री. रोहन निकम, श्री. अभिजीत माळवे, श्री. सतीश भोसले, श्री. माडकर, अॅड. रोहित अहिवळे, चेतन फडतरे यांनी सहकार्य केले.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) प्राचार्या सौ. मिनल दिक्षित व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.सी.) यांनीदेखील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मुधोजी महाविद्यालयाचे एन.सी.सी. विभागप्रमुख श्री. संतोष धुमाळ व त्यांचे सर्व कँडेट तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे एन.सी.सी. विभागप्रमुख श्री. डी.जे. पवार व त्यांचे सर्व कॅडेट व अॅम्बुलन्स सेवा अनमोलरत्न अॅम्बुलन्सचे श्री. अमोल रोमन, फलटण केमिस्ट व ड्रगिस्टचे राज जाधव व त्यांचे सहकारी या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुजित जमदाडे व श्री. मुळीक यांनी केले व क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ यांनी आभार मानले.