ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘स्टुडंट्स लेड कॉन्फरन्स’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत कशाप्रकारे सहभाग घेतात, हे पालकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी ‘स्टुडंट्स लेड कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थीच शिक्षक बनून मार्गदर्शकाची भूमिका साकारतात. या परिषदेचे उद्घाटन ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा अकलूज प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अध्ययन केलेल्या सर्व विषयातील काही घटकांचे पालकांना विविध शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने स्पष्टीकरण केले. यामध्ये शाळेतील सर्व वर्गखोल्यांमध्ये विषयनिहाय विभाग करून प्रत्येक विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सर्व घटकांचे सादरीकरण केले. यामध्ये इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास, हिंदी, मराठी, कॉम्प्युटर, सामाजिक शास्त्र या सर्व विषयातील प्रात्यक्षिके तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचबरोबर आर्ट क्राफ्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून विविध प्रकारच्या टिकाऊ वस्तू, चित्रकला, हस्तकला यांचे प्रदर्शन करण्यात आले.

विद्यार्थी स्पष्टीकरण करत असताना त्यांच्यातील आत्मविश्वास, संवाद साधण्याची कला पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, खजिनदार तथा अकलूज प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे, उपप्राचार्या शितल फडतरे, स्कूल अडमिन रमेश सस्ते, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!