
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । साताऱ्यातील कोरेगाव येथे हुल्लडबाजी करणाऱ्या दोघांना अडवल्याने एकाने पोलिसावर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चाकू हल्ला केलेल्या दोन युवकांना पोलीसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सनी जाधव, सादिक शेख असं या आरोपीचं नाव आहे. कोरेगाव ते रहिमतपूर रस्त्याने हे दोघे चाकू हातात घेउन दुचाकी वरून परिसरात हुल्लडबाजी करत दहशत पसरवत होते. याची माहिती पोलिसाना समजताच या दोघांचा पटलाग करत पोलीसांनी अडवले. त्यांनतर सादिक शेख याने पोलिसावर चाकू हल्ला करतं पोलिसाना जखमी केले. पोलीसांनी मोठया शिताफीने या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर हल्ला आणि परिसरात चाकू घेऊन दहशत पसरवल्या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
