वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करा : सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०९ जून २०२३ | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा फलटण मुक्कामी असताना वारकऱ्यांची कसलीही गैरसोय होऊ नये; याची खबरदारी फलटण प्रशासनाने घ्यावी. यासोबतच वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा; असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिले.

फलटण येथे पालखी तळाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणचे पालखी तळ हे मोठे असून या ठिकाणी मानाच्या दिंड्या आहेत; त्या सर्व एकाच ठिकाणी बसत असून या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही; याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. यासोबतच नोंदणी नसलेल्या दिंड्यांची सुद्धा विशेष व्यवस्था करावी असे निर्देश सुद्धा यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील इतर पालखीतळांच्या तुलनेमध्ये फलटणचे पालखी तळ भव्यदिव्य असून इथे पालखीची योग्यरीत्या नियोजन केले जाते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून फलटण पालखी तळावर कोणतीही कमतरता भासू देणार नाही; याची ग्वाही फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

यावेळी फलटणसह तरडगाव व बरड पालखी तळाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी घेतला.


Back to top button
Don`t copy text!