तळागाळात पोहोचून संघटना मजबूत करावी

खा. नितीन पाटील; सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक


दैनिक स्थैर्य । 2 जुलै 2025 । सातारा । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष, संघटना मजबूत करावी, असे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले.

सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष सीमा जाधव, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, किसनवीर कारखान्याचे संचालक सचिन जाधव, अरविंद कदम, बबनबाबा साबळे, माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, इंद्रजित ढेंबरे, माजी तालुकाध्यक्ष शशिकांत वाईकर, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवती प्रदेश संघटक स्मिता देशमुख उपस्थित होत्या.

खा. पाटील म्हणाले, पक्षाचे सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी झोकून देऊन काम करावे. यावेळी बाळासाहेब सोळसकर, इंद्रजित ढेंबरे, अरविंद कदम, सचिन जाधव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस संपतराव शिंदे, विक्रांत साबळे, विकास साबळे, युवराज पाटील, नीलेश पाटील, संभाजी कदम, मंगेश कदम, प्रा. इंद्रजित नलवडे, शिर्के, माधव लोहार, सचिन इंगवले, धनाजी गायकवाड, गणेश चव्हाण, सोमनाथ देशमुख, नारायण पाटील, धैर्यशील साळुंखे, मारुती जाधव, चंद्रकांत शेडगे, प्रदीप शिंगटे, ऋषीकेश चोरगे, निनाद चोरगे, संदीप जाधव, संतोष कदम, अरविंद शिंगटे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!