आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

विलास ताजने; शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । 21 जून 2025 । फलटण । सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, प्रगत कृषि तंत्रज्ञान, कृषिमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने प्लॅस्टिकचा वापर व वाव या विषयावर प्रतिपादन विलास ताजने यांनी केले. ते श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलत होते.

कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण, रिव्हिलीस इंडिया लिमिटेडचे नितीन जाधव, योगेश कुलकर्णी, श्री. शहाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर म्हणाले, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. शेतकरी प्रयोगशील आहे, त्याला संधी उपलब्ध करून द्यायला हवी, शेती आता पारंपरिक राहिली नसून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. फवारणीसाठी ड्रोनचा वापर होणे गरजेचे आहे.

प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर होत आहे, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन, नवीन कृषी तंत्रज्ञानाचे माहिती, समुह शेती या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. ए.डी. पाटील यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!