सुविधा समृद्ध कोळकीसाठी राष्ट्रवादी हा एकमेव पर्याय; सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे यांचे प्रतिपादन


स्थैर्य, फलटण दि.9 : झपाट्याने विस्तारणार्‍या आपल्या कोळकी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आजवर अनेक विकासकामे झाली आहेत. वाढत्या नागरिकरणामुळे गावात आगामी काळात आणखीन दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देवून सुविधा समृद्ध कोळकीसाठी राष्ट्रवादी हा एकमेव उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाचे अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.

कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा जोमात कार्यान्वित करण्यात आली असून प्रामुख्याने मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटीवर सर्वांनीच जोर दिला आहे.

रस्ते, पाणी, ग्रामस्थांचे आरोग्य, स्वच्छता, युवकांना रोजगार, प्रदुषणमुक्त वातावरण या प्रमुख विकासकामांवर आगामी पाच वर्षात कार्यरत राहण्यासाठी आम्ही सर्वच राजेगट पुरस्कृत उमेदवार कटीबद्ध राहणार आहोत. गावात पक्के रस्ते, स्वच्छ आणि शुद्ध मुबलक पिण्याचे पाणी, गावातील रिकाम्या प्लॉटमध्ये स्वच्छता, युवकांना रोजगाराच्या संधी, व्यवसायांना प्रोत्साहन, हरित व प्रदूषणमुक्त कोळकीसाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम याचबरोबर नागरिकांना येणार्‍या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहणार असून यासाठी मतदारांनी साथ द्यावी, असेही आवाहन सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!