अजमल कसाबला जिवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेंचे स्मारक आजही दुर्लक्षितच


स्थैर्य, केळघर, दि.२६: मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणाऱ्या केडंबे (ता. जावळी) येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या हुतात्म्याच्या स्मारकाबाबत शासनाबरोबर जिल्हा प्रशासन उदासीन आहे.

हुतात्मा ओंबळे यांच्या असीम धैर्य व धाडसामुळे मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे, हे स्पष्ट झाले. आपल्या हातातील काठीच्या साहाय्याने ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. त्यांच्या पराक्रमाची चर्चा संसदेतही झाली होती. तत्कालीन विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ओंबळे यांच्या या पराक्रमाची माहिती सभागृहात दिली होती. अमेरिकेच्या संसदेतदेखील त्यांच्या या पराक्रमाचा गौरव करण्यात आला होता. हुतात्मा ओंबळे यांचे नाव गुजरात राज्यातील पाइपलाइनला देण्यात आले आहे, तर मुंबई येथील गिरगाव चौपाटीच्या प्रवेशद्वाराजवळ ओंबळेंचे स्मारक उभारण्यात आले आहे. गोरेगाव, बोरिवली येथील उद्यानांनाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबईतील विविध रस्त्यांना हुतात्मा ओंबळे यांचे नाव दिले गेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होत असताना मात्र त्यांच्या जन्मगावात त्यांचे स्मारक 13 वर्ष उलटून गेली तरी होत नाही, हे दुर्दैव आहे. या स्मारकासाठी ग्रामपंचायतीने जागाही उपलब्ध करून दिले आहे. स्मारकासाठी एक कोटी रुपये निधीही मंजूर आहे. मात्र, स्मारक का रखडले आहे याचे कोडे ग्रामस्थांनाच पडले आहे.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!