स्थैर्य, सातारा, दि.२६: खूप काही बोलावे अशी तुमची इच्छा आहे, मात्र मला मुंबईला जायचे आहे. तिथे लोक माझी वाट पाहत आहेत. तिथे गेल्यानंतर सर्वकाही नीटनेटके करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला एक विनंती करतो मुंबईतील नीटनेटके केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांना आपल्या कामातून मोकळे करा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गतवर्षी क-हाड येथील एका कार्यक्रमात केले हाेते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शरद पवारांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना नामदार केले. त्यांच्या गळ्यात सहकारमंत्रीपदाची माळ घातली.
एकरकमी एफआरपीचे कारखान्यांना आदेश देऊ ; अजित पवारांचे ‘स्वाभिमानी’ला आश्वासन
गतवर्षीच्या विधानसभेच्या निवडणूकीनंतर भाजपाबराेबर शिवसेनेने फारकत घेतल्याने राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले हाेते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू हाेती. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत हाेते.
कराड उत्तर हा माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख असणारे यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेल्याने आणि कोरेगावात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला हाेता. त्यामुळे बाळासाहेब पाटील मंत्रीपदासाठी साताऱ्यातून मोठे दावेदार हाेते. गेली 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी होत हाेती.
गतवर्षीच्या सत्ता स्थापनेपुर्वी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे कराडला आले. त्यानंतर ते यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ तसेच सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनास आले हाेते. खासदार श्रीनिवास पाटील हे अध्यक्षस्थानी
होते.
महाराष्ट्रात आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ; जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त
त्यावेळी श्री. पवार म्हणाले, मी खूप काही बोलावे अशी तुमची इच्छा आहे, मात्र मला मुंबईला जायचे आहे. लोक माझी वाट पाहत आहेत. तिथे गेल्यानंतर सर्वकाही नीटनेटके करणार आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि सगळे काही नीट नेटके केल्यानंतर तुम्हाला एक विनंती करणार आहे, आमदार बाळासाहेब पाटील यांना आपल्या कामातून थोडा वेळ रिकामे करा, पवारांच्या या वाक्याचा अर्थ कार्यकर्त्यांना उमगला आणि कार्यक्रमस्थळी एकच जल्लाेष झाला. कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा
गजरात बाळासाहेब पाटील आगे बढाे हम तुम्हारे साथ है… काेण आला रे आला सहयाद्रीचा वाघ आला अशा घाेषणा दिल्या.
राज्यातील महाविकास आघाडीत सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील हे सध्या कार्यरत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांना मानणा-या नेतृत्वांपैकी बाळासाहेबांच्या कार्याचे चीज झाले. साहेबांना दिलेला शब्द पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये आजही दांडगा उत्साह दिसताे.