पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा करून विवाह संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
तालुक्यातील जळोची येथे शनिवार, १४ रोजी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करून शुभविवाह संपन्न झाला.

प्रथम बैलांना व गाईला हळदी लावण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात मलगुंडे वस्ती ते जळोची गाव अशी मिरवणूक काढण्यात आली व ग्रामदैवत काळेश्वरचे दर्शन घेण्यात आले. मिरवणुकीनंतर पारंपरिक पद्धतीने मंत्रपोचार करीत वरमाला घालून व उपस्थित वर्‍हाडी ग्रामस्थ यांना भोजन देऊन विवाह सोहळा मलगुंडे वस्ती या ठिकाणी संपन्न झाला.
याप्रसंगी शेतकरी जगन्नाथ मलगुंडे, पोपट मलगुंडे, गणपत मलगुंडे, देव गवळी, अभिजित वणवे, संतोष मलगुंडे, भिवा मलगुंडे, त्रिंबक मलगुंडे, अनिल मलगुंडे, आप्पा मलगुंडे, संदीप मलगुंडे, अविनाश मलगुंडे, सचिन मलगुंडे व कुटुंबिय उपस्थित होते.
पाखर्‍या, राजा, सर्ज्या, पोपट्या, उल्हास ही बैलजोडी तर चंद्रा, हरणी, नर्मदा, गवळी या गाय जोडीचा विवाह संपन्न झाला.

वर्षभर शेतात राबणारा बैल व दुध देणारी गाय खरे पशूधन होय. त्यामुळे बाजारातून नवीन आणलेली गाई-बैलांचे त्यांचे पूजन करून विवाह लावणे ही प्रथा आहे. याप्रमाणे विवाह लावला जातो व त्यांच्याबदल कृतज्ञता व्यक्त केली जात असल्याचे शेतकरी संतोष मलगुंडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!