म्हसवड येथील माणदेशी फौंडेशन बनले कोव्हीड योद्धा


 

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना जंबो रुग्णालयासाठी मदत देवु करताना माणदेशी चँम्पीयनचे प्रमुख प्रभात सिन्हा.

स्थैर्य, म्हसवड दि. ८: संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आपला सातारा जिल्हा त्याला अपवाद राहिला नाही. सुरुवातीच्या काळात कमी अधिक संख्येत सातारा जिल्हा हा सुरक्षित वाटत असताना, अचानक सातारा जिल्हा रेड झोन जाऊन हॉट्स्पॉट बनला. हजारावरून तीस हजार कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्यामध्ये सापडले. यावेळी शहराबरोबर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग पसरला आणि एकप्रकारे आणीबाणी ची परिस्थिती निर्माण झाली असताना एक सामाजिक दृष्टीकोनातुन म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनने या महामारीच्या विरोधात आपली लढाई सुरु करीत यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आजवर अडीच कोटी रुपयांची यंत्रसामग्री देवुन खर्या अर्थाने माणदेशी फौडेशन कोव्हीड योध्दा बनल्याचे चित्र आहे.

अशा वेळी सातारा जिल्ह्यामध्ये सरकारी यंत्रणा, हॉस्पिटल चे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, हे सर्वजण कोरोना विषाणुचा सामना करीत असुन ९ ऑक्टोबंर रोजी सातारा येथे सुसज्ज असे ३०० बेड चे कोविड हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सुरु होत आहे.

या जम्बो हॉस्पीटल उभारणी मध्ये माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिंह आणि माणदेशी चॉम्पियन चे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी माणदेशी फौंडेशनच्या मदतीने सर्वोतोपारी मदत करून ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांना वाचवायचे असे ठरविले‌ आहे सदर हॉस्पिटल साठी लागणारी सामग्री देऊ केली असुन त्यासाठी जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये ७० लाखाचे 28 HFNO device हे माणदेशी हे माणदेशी फौंडेशन कडून देण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे येथील ससून रुग्णालय मध्ये ही आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन च्या काळात २४ हजार गरजू लोकांना अन्नदान करून भूकेलेल्यांची भूक भागवण्याचे काम माणदेशी फौंडेशनने विविध ठिकाणी केले 

गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णांसाठी १६ ऑक्सिजन बेड आणि ६आय सी यु बेड चे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. थोड्याच दिवसात हे सुसज्ज कोविड हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुरु होत आहे, 

यावेळी माणदेशी फौंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमती रेखा कुलकर्णी यांनी २० हजार लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याचीही माहिती दिली. 

माणदेशी फौंडेशनने आजपर्यंत २ कोटी ५० लाखांची भरीव मदत कोरोना विषाणू निर्मुलनासाठी केली आहे. तसेच कोरोना च्या काळामध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे धैर्य, घरच्यांचे प्रेम आणि सकस पोषक आहार. कोरोना संक्रमणाच्या काळात हे मिळणे कठीण होऊन बसल्याने, माणदेशी महिला बँक आणि माणदेशी फौंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती चेतना सिंन्हा आणि माणदेशी चॅम्पीयनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी ठरविले की आपल्या तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांना सकस आहार मिळाला पाहिजे या हेतूने या माणदेशी फौंडेशन तर्फे सर्वाना पोषक आहार, मोसंबी, खजूर, केळी देण्याचे ठरविले आणि सुरुवात ही केली . 

यावेळी माणदेशी महिला बँक आणि माणदेशी फौंदेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या की, आज आपण सर्वजण मोठ्या संकटाच्या अनुभवातून जात आहोत. या संकट काळात आम्ही तुमच्या परीवारासारखे तुमच्या सोबत आहोत. जेवढ काही शक्य आहे ते आम्ही नक्की करू. आपण विश्रांती घ्यावी, चांगल्या आहाराचे सेवन करा, आणि लवकर बरे होऊन घरी जावे ही सदिच्छा.

या संकट काळात माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून मदत करणारे H.S.B.C.बँक आणि CIPLA फौंडेशन, इंडसईन बँक यांचे सातारा जिल्हावासीय कायम ऋणी राहील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!