
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2025 | फलटण | विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी गावातील गेली अनेक वर्षे बंद असलेले पाणंद रस्ते यासोबतच सिटी सर्वेमध्ये मंजूर असलेले रस्ते खुले करून त्यावर मुरुमीकरण करण्यात यावे, अशी मागणी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे केली होती, त्यावर तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी तातडीने कार्यवाही करून येणाऱ्या महिनाभरात सदरील रस्त्यांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे निवेदन देत मागणी केली. त्यावर तातडीने प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
यावेळी विडणी गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
