महारक्तदान शिबीराचा उपक्रम समाजहिताला प्राधान्य देणारा : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 02 जुलै 2021 । फलटण । रक्तवीर संघटनेच्या पुढाकाराने सलग 3 दिवस रक्तदान शिबीराचे आयोजन करुन महारक्तदान शिबीराचा प्रयत्न प्रेरणादायी आणि समाजहिताला प्राधान्य देणारा असल्याचे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग, दै सकाळ, संभाजी ब्रिगेड, सद्गुरु प्रतिष्ठान, रक्तवीर संघटना यांच्या संयुक्त सहभागाने येथील महाराजा मंगल कार्यालयात दि. 27, 28, 29 जून रोजी आयोजित भव्य रक्तदान शिबीराच्या समारोपाप्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, महात्मा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ऋषिकेश बिचुकले, भाऊसाहेब कापसे आदींची प्रमुख उपस्थित होती.

सलग 3 दिवस सुरु असलेल्या रक्तदान महोत्सवात 671 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जपली. या महोत्सवात रेड प्लस ब्लड बँक पुणे, पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, फलटण मेडिकल फौंडेशन संचलित ब्लड बँक फलटण या रक्त पेढ्यांनी सहभाग घेतला. शहर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संघटना, स्थानिक सर्व पत्रकार, व्यापारी असोसिएशन यांच्यासह तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांचे बहुमोल सहकार्य लाभले.

शिबीराच्या यशस्वी संयोजनासाठी ऋषिकेश बिचुकले, दीपक मोहिते, ज्ञानेश्‍वर घाडगे, विशाल शिंदे, अमर चोरमले, आशिष काटे, सनी निकम, नितीन शेवते, विनीत शिंदे, सुरत चोरमले, सूनील अब्दगिरे यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट, बनियन, सॅनिटायझर बॉटल आणि चहा नाश्ता देवून सन्मानित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!