
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. 02 जुलै 2021 । फलटण । सातारा जिल्हा अपंग विकास आघाडीच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची महती सांगून ‘समान संधी समान हक्क कायदा 1995’ चा उल्लेख करुन आगामी फलटण नगरपरिेदेची निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करुन शहरातील प्रत्येक वॉर्डमधून एका दिव्यांग व्यक्तीस उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी यावेळी जाहीर केले.
दिव्यांग व्यक्तींना कोणीही नाहक त्रास देत असल्यास तंटामुक्तीसाठी संघटनेकडे संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास दिक्षा दिव्यांग बचत गटाचे सचिव संतोष काकडे आदींसह पदाधिकारी, सदस्य, दिव्यांग बांधव उपस्थित होते.
