परळी खोऱ्यातील साखळी तोडण्यासाठी झटतोय आरोग्य विभाग


गावोगावी जाऊन केले जातेय ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

स्थैर्य, सातारा, दि. 10 : सातारा जिल्ह्यात करोना चा वाढता आलेख हा जिल्हावासीयांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईहून परतणाऱ्यांची संख्या ही लाखोंच्यावर आहे त्यातीलच बहुतांश हे बाधित आढळल्याने जिल्ह्यातील आकडा हा सहाशेच्या जवळजवळ पोहचला आहे. त्यात परळी खोऱ्याचा आकडा हा 23 झाला असल्याने आरोग्य विभागाला साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र झटावे लागत आहे.

परळी-ठोसेघर हा भाग दुर्गम असून याठिकाणी फोनची रेंजही नाही. अशातच या भागात बाधित संख्या वाढल्याने भागातील करोना साखळी वाढू नये यासाठी परळीचे वैधकीय अधिकारी डॉक्टर सचिन यादव तसेच ठोसेघरच्या वैधकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांच्या टीमने कंबर कसली आहे.

ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात ते गाव सील करून तत्काळ गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे तसेच इतरही गावातून ज्या मुंबईवाल्यानं 14 दिवस पूर्ण झाले असतील आशा गावात जाऊन 60 वर्षा वरील सर्वजेष्ठ नागरिकांची तपासणी ही केली जात असल्याने ग्रामस्थानकडून आरोग्य विभागासाठी समाधान व्यक्त होत आहे.

ठोसेघरचे आरोग्य कर्मचारी पी.एस. ननावरे, आशिष गायकवाड, आरोग्य सेवक जाधव, आरोग्य सेविका शिलवंत, सारिका शिंदे, आशा शुभांगी जीमन, मनीषा गोळे, सुवर्णा पिंपळे, अनिता देशमुख, रेश्मा जाधव तर परळीचे आरोग्य कर्मचारी महेश भोसले, कैलास मोरे, आरोग्य सहाय्यक  ए. जी. बोधे, एस.डी. गवते, आरोग्य सेविका व्ही. व्ही. जोशी, एस.सी. ढुमणे, आशा रेश्मा देटे, ललिता सावंत,  सुरेखा लोटेकर, मंगल निकम, अंगणवाडी सेविका निर्मला शिरटावले, वैजनता शिरटावले, सुनीता वाईकर, सोनाली लोटेकर, लक्ष्मी लोटेकर, सुनीता शिरटावले या कोरोना योद्यांनी साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!