मुधोजी हायस्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रम रॅलीद्वारे संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे करण्यात आले होते. फलटण तहसिल कार्यालय, फलटण नगरपरिषद व मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण तसेच तालुक्यातील सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. फलटण शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात मुधोजी हायस्कूलपासून होऊन डेक्कन चौक – महात्मा फुले चौक – गजानन चौक मार्गे ही रॅली काढण्यात आली. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाला फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, न. प. मुख्याधिकारी निखील मोरे, गटविकास अधिकारी बोडरे, गटशिक्षण अधिकारी अनिल संकपाळ व मुधोजी हायस्कूल प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवळे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, शिक्षक, विद्यार्थी व सेवक वर्ग उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!