पालकमंत्र्यांनी घेतला दहावी- बारावी परीक्षांच्या पूर्वतयारीचा आढावा


स्थैर्य, अकोला, दि.०५: शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज  जिल्ह्यात होणाऱ्या माध्यमिक शालान्त( इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालान्त (इयत्ता बारावी) परीक्षांच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी ना. कडू यांनी दिले. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार,  मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर पोलीस अधीक्षक  मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थिंची संख्या त्यानुसार केंद्र संख्या. नियोजित केंद्रांवरील सर्व सज्जता याबाबत त्यांनी आढावा घेतला.  परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या कामासाठी नियुक्त परीक्षक, केंद्र प्रमुख व अन्य आवश्यक कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करुन घ्याव्या. परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन करावे. विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करावी. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी व खबरदारी घ्यावी,अशी सुचनाही ना. कडू यांनी केली.

विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या कु. पायल मोहन गवई या विद्यार्थिनीच्या पालकांची आज भेट घेऊन सांत्वन केले. ना. कडू यांनी  घडलेल्या घटनेची सखोल माहिती घेतली व पालकांचे सांत्वन केले.


Back to top button
Don`t copy text!