स्थैर्य, फलटण, दि. २०: कोरोना रुग्णांना जीवदान ठरणाऱ्या रेमडीसिविर इंजेक्शनच्या बनावट विक्रीवर काल बारामतीत कारवाई करण्यात आली. माध्यमांमधील वृत्तानुसार रेमीडिसीवर च्या रिकाम्या कुप्यामध्ये पॅरासिटीमॉल या औषधाचे पाणी भरून हे इंजक्शन सुमारे ३५ हजाराला विकण्याचा प्रताप काही महाभाग करत होते. महामारीच्या काळात आशा घटना घडणे हे फारच दुदैवी आहे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा फलटण तालुका गुरव समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र अनंतराव शेंडे यांनी केलेले आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाल्यानंतर अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. बिकट परिस्थितीत रुग्णांना जीवदान ठरणाऱ्या रेमिडीसीवर या इंजेक्शनची कमतरता निर्माण झाली असून काही महाभाग या परिस्थितीचा दुरुपयोग करून बनावट इंजेक्शने विकून रुग्णांना फसवत तर आहेच शिवाय त्यांच्या जीवाशीही खेळत आहेत. हा प्रकार निंदनीय असून याला आळा घालण्यासाठी शासनाने रेमडीसिविरच्या वापरानंतर रिकाम्या कुप्या नष्ट करण्याचे आदेश तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यातील आरोग्य यंत्रणेला देने क्रमप्राप्त बनले आहे. जर असा गैरवापर आढळला तर दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असेही या आदेशात नमूद करणे गरजेचे आहे. तरच अशा गैर प्रकारांना आळा बसेल, असेही जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा फलटण तालुका गुरव समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र अनंतराव शेंडे स्पष्ट केले.