शंकर मार्केट मधील भाजी मंडई मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; नगरपालिकेकडून कारवाईची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ०८ : फलटण शहरामध्ये शंकर मार्केट येथे भरणाऱ्या भाजी मंडई मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून येथे मास्क व सॅनिटायझर सुद्धा नीट वापरले जात नाही. व्यापाऱ्यांवर जशी कोरोना चाचणी बंधनकारक केलेली होती त्याच प्रकारे भाजी व फळे विक्रेत्यांना कोरोना चाचणी बांधकारक करण्याची मागणी होत आहे. त्या सोबतच शंकर मार्केट येथे होत असणाऱ्या भाजी मंडई मध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात याव्यात व या बाबत ठोस पावले उचलावीत अशी हि मागणी तेथील रहिवास्यांकडून होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!